लंकेजवळ पोचल्यावर युद्ध सुरु करण्याआधी श्रीरामाने वाली  व तारा यांचा तेजस्वी पुत्र अंगद याला वकील म्हणुन रावणाकडे पाठवले. लंकेत ...



लंकेजवळ पोचल्यावर युद्ध सुरु करण्याआधी श्रीरामाने वाली  व तारा यांचा तेजस्वी पुत्र अंगद याला वकील म्हणुन रावणाकडे पाठवले. लंकेत पोचल्यावर त्याने रावणाशी संवाद साधताना त्याने रामाचा निरोप सांगितला की सीतेला सन्मानाने परत पाठव अन्यथा युद्धास तोंड द्यावे लागेल.  हे ऐकून रावण रागावला आणि त्याने अंगदाला पकडून तुरुंगात टाकायची आज्ञा केली. अंगदाने तेव्हा लंकेत हाहाकार उडवून दिला आणि शेपटीने जाळपोळ केली. तदनंतर तो रामाकडे परत आला. 


वाल्मिकी रामायणाच्या युद्धकांडाच्या ४१ व्या सर्गात या प्रसंगाचे वर्णन येते. परंतु वाल्मिकी रामायणात अंगदाने शेपूट वापरून आसन तयार केले असे वर्णन मला सापडले नाही. परंतु लोक साहित्यात असे वर्णन वारंवार येते. 


उत्तराखंड मध्ये केदारकण्ठ ट्रेक ची सुरवात जिथे होते त्या सांकरी गावातील समेश्वर मंदिरातील हे अंगद शिष्टाईचे चित्र 

जानेवारी २०२१. 



ऋषी विश्वामित्र श्रीराम व लक्ष्मणाला घेऊन राजा जनक कडे आले आणि त्यांनी श्रीरामाच्या वतीने शिवधनुष्याची मागणी केली. तेव्हा राजा ज...

ऋषी विश्वामित्र श्रीराम व लक्ष्मणाला घेऊन राजा जनक कडे आले आणि त्यांनी श्रीरामाच्या वतीने शिवधनुष्याची मागणी केली. तेव्हा राजा जनक याने ते धनुष्य 
भुमीजा सीता हिच्या विवाहाची अट म्हणुन ठेवल्याचे सांगितले. तसेच ते मला (राजा जनक याला) माझ्या पित्याकडून राजा देवरत यांच्याकडून मिळाले आहे असे सांगितले. 
भुमीजा सीता लहान असताना तिच्या बहिणींशी खेळताना तिने हे शिवधनुष्य पिनाक ठेवलेली गाडी एका हाताने हलवली होती आणि त्यानंतर ते परत कुणीही ती एकटा दुकटा ती गाडी हलवू शकले नाही त्यामुळे जो हे धनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा जोडू शकेल तोच वर तिच्या साठी योग्य असेल, असे मला वाटते. चाके असलेली गाडी ज्यावर हे शिवधनुष्य ठेवले होते ती गाडी ओढायला ५००० बैल लागल्याचे मानले जाते. या आधी काही लोकांनी ते उचलायचा प्रयत्न केला परंतु ते असफल झाले आणि राग येऊन त्यांनी मिथिला नगरीवर अत्याचार केले. जर श्रीरामाने त्या धनुष्यास प्रत्यंचा चढवली तर मी माझी पुत्री भुमीजा सीता देखील त्याला देईन कारण केवळ तोच तिचे रक्षण करू शकेल. 

पश्यतां नृसहस्राणां बहूनां रघुनंदनः |
आरोपयत्स धर्मात्मा सलीलमिव तद्धनुः || १-६७-१६
आरोपयित्वा मौर्वीं च पूरयामास वीर्यवान् |
तद्बभंज धनुर्मध्ये नरश्रेष्ठो महायशाः || १-६७-१७

काही हजार लोक बघत असताना सदाचरणी रामाने त्या धनुष्यावर प्रत्येंचा चढवली. १-६७-१६
जेव्हा श्रीरामाने त्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवली आणि त्याचा टणत्कार ऐकून ती नीट लागली आहे ना हे पाहण्यासाठी ती ओढली असता खूप मोठा आवाज होऊन ते धनुष्य तुटले. १-६७-१७

आणि श्रीराम जानकी विवाह निश्चित झाला. 

वाल्मिकी रामायणाच्या बाल कांडाच्या सर्ग ६६ व ६७ मध्ये शिव धनुष्याचे व वरील प्रसंगाचे वर्णन आले आहे. 

श्रीराम धनुष्यावर प्रत्यंचा चढवतानाचे चित्र 
१) हजारी राम मंदिर हम्पी कर्नाटक 
२) ओरछा मध्य प्रदेश येथील भित्तीचित्र 

श्रावण कुमार अयोध्येत राहणारा एक तरुण. आपल्या वृद्ध आई वडिलांना तीर्थयात्रा करण्यास कावड मध्ये बसवुन घेऊन जातो. त्यांना तहान लाग...

श्रावण कुमार अयोध्येत राहणारा एक तरुण. आपल्या वृद्ध आई वडिलांना तीर्थयात्रा करण्यास कावड मध्ये बसवुन घेऊन जातो. त्यांना तहान लागली असे लक्षात येताच शरयू नदीकिनारी त्यांना थांबवुन घागरीने पाणी आणण्यास तो नदी जवळ जातो. घागर पाण्यात बुडताना जो आवाज येतो त्या आवाजाचा वेध घेऊन शब्दभेदी राजा दशरथ लपल्या जागेवरून बाण सोडतात जो श्रावण बाळाला मर्मस्थानी लागतो. राजा दशरथ जेव्हा बघायला येतात तेव्हा हा मर्मस्थानी लागलेला बाण काढायला श्रावण बाळाची विनंती त्यांना संभ्रमात टाकते. बाण काढला तर रक्तस्त्राव होऊन मृत्यू होईल, बाण नाही काढला तर मर्मस्थानी होणाऱ्या वेदनेने मृत्यू येईल. आणि ब्रह्म हत्येचे पातक शिरी आलेच आहे. परंतु त्या स्थितीत देखील श्रावण कुमार राजा दशरथाला म्हणतो मी ब्राह्मण नाही, माझी आई शूद्र आहे आणि माझे वडील वैश्य. परंतु या एका बाणाने तु केवळ माझीच नव्हे तर माझ्या वृद्ध अंध आई वडिलांची देखील हत्या केली आहेस. 

या पायवाटेने तू पुढे जा, ते दोन्ही वृद्ध तुला तिथे झाडाखाली आसरा घेऊन बसलेले दिसतील. त्यांची क्षमा माग. सांगितल्या प्रमाणे राजा दशरथ जेव्हा तिथे पोचला तेव्हा त्याने त्या दोन्ही वृद्धांना सर्व'कहाणी सांगितली आणि क्षमा मागितली. त्यांना श्रावण बाळाच्या मृतदेहाजवळ नेले असता त्यांचा शोक अनावर झाला व त्यांनी राजा दशरथाला तुलाही पुत्रशोक होईल असा शाप दिला. 

वाल्मिकी रामायणात हि गोष्ट हल्लीच्या काळा प्रमाणे पार्श्वभुमी, किंवा एक्सपोसिशन म्हणुन येत नाही. तर अयोध्या कांडात सर्ग ६३ आणि ६४ मध्ये श्री राम, जानकी आणि लक्ष्मण वनवासाला निघुन गेल्यावर राजा दशरथ राणी कौसल्येस कथन करतात. तसे पाहता श्रावण बाळाचे नाव वाल्मिकी रामायणात येत नाही, परंतु भारतीय साहित्यात श्रावण बाळ हे आई वडिलांच्या प्रति असेलल्या भक्ती चे प्रतीक म्हणुन सर्रास वापरले जाते. 

श्रावण बाळ आई वडिलांना घेऊन यात्रेस निघालेला हे छायाचित्र सांकरी जिल्हा उत्तरकाशी उत्तराखंड येथील समेश्वर या मंदिरातले. (जानेवारी २०२१)