ऋषी विश्वामित्र श्रीराम व लक्ष्मणाला घेऊन राजा जनक कडे आले आणि त्यांनी श्रीरामाच्या वतीने शिवधनुष्याची मागणी केली. तेव्हा राजा ज...

श्रीराम जानकी विवाह

ऋषी विश्वामित्र श्रीराम व लक्ष्मणाला घेऊन राजा जनक कडे आले आणि त्यांनी श्रीरामाच्या वतीने शिवधनुष्याची मागणी केली. तेव्हा राजा जनक याने ते धनुष्य 
भुमीजा सीता हिच्या विवाहाची अट म्हणुन ठेवल्याचे सांगितले. तसेच ते मला (राजा जनक याला) माझ्या पित्याकडून राजा देवरत यांच्याकडून मिळाले आहे असे सांगितले. 
भुमीजा सीता लहान असताना तिच्या बहिणींशी खेळताना तिने हे शिवधनुष्य पिनाक ठेवलेली गाडी एका हाताने हलवली होती आणि त्यानंतर ते परत कुणीही ती एकटा दुकटा ती गाडी हलवू शकले नाही त्यामुळे जो हे धनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा जोडू शकेल तोच वर तिच्या साठी योग्य असेल, असे मला वाटते. चाके असलेली गाडी ज्यावर हे शिवधनुष्य ठेवले होते ती गाडी ओढायला ५००० बैल लागल्याचे मानले जाते. या आधी काही लोकांनी ते उचलायचा प्रयत्न केला परंतु ते असफल झाले आणि राग येऊन त्यांनी मिथिला नगरीवर अत्याचार केले. जर श्रीरामाने त्या धनुष्यास प्रत्यंचा चढवली तर मी माझी पुत्री भुमीजा सीता देखील त्याला देईन कारण केवळ तोच तिचे रक्षण करू शकेल. 

पश्यतां नृसहस्राणां बहूनां रघुनंदनः |
आरोपयत्स धर्मात्मा सलीलमिव तद्धनुः || १-६७-१६
आरोपयित्वा मौर्वीं च पूरयामास वीर्यवान् |
तद्बभंज धनुर्मध्ये नरश्रेष्ठो महायशाः || १-६७-१७

काही हजार लोक बघत असताना सदाचरणी रामाने त्या धनुष्यावर प्रत्येंचा चढवली. १-६७-१६
जेव्हा श्रीरामाने त्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवली आणि त्याचा टणत्कार ऐकून ती नीट लागली आहे ना हे पाहण्यासाठी ती ओढली असता खूप मोठा आवाज होऊन ते धनुष्य तुटले. १-६७-१७

आणि श्रीराम जानकी विवाह निश्चित झाला. 

वाल्मिकी रामायणाच्या बाल कांडाच्या सर्ग ६६ व ६७ मध्ये शिव धनुष्याचे व वरील प्रसंगाचे वर्णन आले आहे. 

श्रीराम धनुष्यावर प्रत्यंचा चढवतानाचे चित्र 
१) हजारी राम मंदिर हम्पी कर्नाटक 
२) ओरछा मध्य प्रदेश येथील भित्तीचित्र